Type Here to Get Search Results !

बोराडी फार्मसी महाविदयालयातील तृतीय वर्षातील विदयार्थ्यांची कॅपिटल नेक्सस एमआयटी इंडिया इंडस्ट्री इन्स्टिट्यूट रिकनेक्ट समिट आयआरएस 2026 साठी निवड..

बोराडी प्रतिनिधी - मनिष सोनवणे 

 किसान विदया प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडी महाविदयालयातील तृतीय वर्ष बी. फार्मसीचे हेमांगी बडगुजर व रेहान गिरासे हया विदयार्थ्यांनी कॅपिटल नेक्सस एमआयटी इंडिया इंडस्ट्री इन्स्टिट्यूट रिकनेक्ट समिट आयआरएस 2026 साठी पुणे येथे निवड करण्यात आली. हया विदयार्थ्यांनी आरोग्य सेवा विभागातर्गत उपकरण तयार केलेले आहे सदर उपकरणचा उपयोग वैदकीय क्षेत्रात चयापचय विकाराच्या मॉनिटरिंग व डायग्नोसिस साठी होणार आहे.

तर हे उपकरण पुणे येथील एमआयटी इंडिया इंडस्ट्री इन्स्टिट्यूट रिकनेक्ट समिट आयआरएस 2026 येथे सादरीकरणासाठी निवड झालेली आहे. तसेच सदर स्टार्टअप्स उपकरण हे उद्योग क्षेत्रातील तज्ञांसमोर सादर करणार आहे 


या उल्लेखनीय यशाबद्दल महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील यांनी हेमांगी बडगुजर व रेहान गिरासे यांचे अभिनंदन केले. विदयार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात पुढाकार घेऊन नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे समाजोपयोगी कार्य करावे, तसेच महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ यांनी कौतुक केले सदर विदयार्थ्यांना डॉ. सचिन एम. महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभुन महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

सदर विदयार्थींच्या यशाबद्दल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहीत रंधे, यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments