शहादा: येथील श्री दत्त कॉलनी भागात पवार परिवाराच्या वतीने दशा माता उत्सवाचे अत्यंत मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. शहादा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. ममताताई पवार तसेच शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक श्री. हेमराजभाई पवार यांच्या निवासस्थानी श्री दशा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
या धार्मिक प्रसंगी शहादा-तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री. राजेशदादा पाडवी साहेब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील साहेब, शहादा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई पाटील, विविध प्रभागांतील नगरसेवक, नगरसेविका, विविध स्तरांतील शासकीय अधिकारी तसेच नातेवाईक व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहून दशा मातेचे दर्शन, आशीर्वाद व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत भव्य महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परिसरातील सर्व स्तरांतील नागरिक व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
दशा मातेच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत दशा माता विसर्जन मिरवणूक अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण व दुमदुमणाऱ्या वातावरणात पार पडली. 'जय दशा माता'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
हा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्रीमती वंदना प्रकाश पवार, श्री. रामेश्वर प्रकाश पवार, सौ. पोर्णिमा रामेश्वर पवार, श्री. हेमराज पवार, सौ. ममता पवार व समस्त पवार परिवाराने विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी पवार परिवाराच्या या उपक्रमाचे व आदरातिथ्याचे मनापासून कौतुक केले.

Post a Comment
0 Comments