रोहा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांचा आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने रोहा-कोलाड मार्गावरील गटारांचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याबाबत आणि या मार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारे अनावश्यक विद्युत खांब हटवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना सूचना दिल्या.
तसेच, रोहा नगरपरिषद अंतर्गत अष्टमी येथील स्लॅब ड्रेनचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, हे काम देखील तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रशासकीय स्तरावरील सर्व अडचणी दूर करून ही विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर आमचा भर आहे, जेणेकरून रोहा वासीयांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. यावेळी, बैठकीला रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजयकुमार एडके आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments