Type Here to Get Search Results !

नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण.........

 नंदुरबार येथे डॉ. हेडगेवार सेवा समिती व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण” कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. दिनांक ६ ते ९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या चार दिवसीय प्रशिक्षणास शेतकरी व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या प्रशिक्षणाद्वारे आधुनिक नर्सरी तंत्रज्ञान, दर्जेदार रोपे निर्मिती, जैविक पद्धतींचा वापर तसेच शेतीसोबत पूरक व्यवसायाच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणात प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, ऑनलाईन-ऑफलाईन सत्रे तसेच नामांकित नर्सरी येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे “प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण” या पुस्तकाचे देहवाली भिली या आदिवासी बोलीभाषेत प्रथमच अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत तांत्रिक माहिती सहज उपलब्ध होणार असून कृषी ज्ञान अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.

स्थानिक भाषा जतन करणे व कृषी क्षेत्रातील प्रगती साधणे या दोन्ही दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments