शहादा प्रतिनिधी : मनिष सोनवणे
शहादा शहरातील प्रभाग क्रमांक 14 ब पुन्हा एकदा सकारात्मक कार्यामुळे चर्चेत आला आहे. नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत नगरसेविका सौ. ममता ताई पवार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आमदार राजेश दादा पाडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील सर आणि उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार संपूर्ण प्रभागात मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी भव्य आणि प्रभावी फवारणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. याच अनुषंगाने नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम केवळ औपचारिक न राहता अत्यंत काटेकोर नियोजनासह राबवली जात आहे. प्रभागातील प्रत्येक गल्ली, वस्ती आणि कोपऱ्यात पोहोचून फवारणीचे काम वेगाने आणि प्रभावीपणे सुरू आहे.
या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्याबाबत जनजागृती निर्माण होत असून नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आपल्या अडचणी ओळखून त्वरित कृती करणारे लोकप्रतिनिधी” अशी भावना नागरिकांच्या मनात अधिक दृढ होत आहे.
ही मोहीम केवळ मच्छर नियंत्रणापुरती मर्यादित नसून स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित शहादा घडवण्याच्या मोठ्या ध्येयाकडे टाकलेले एक ठोस पाऊल आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून इतर प्रभागांसाठीही हा एक आदर्श ठरत आहे.
जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या या नेतृत्वाला मनापासून सलाम!*
सेवा, समर्पण आणि कार्यक्षमता यांचे उत्तम उदाहरण — प्रभाग 14 ब.

Post a Comment
0 Comments