मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 'इंडियन मेडिकल पार्लमेंट फोरम'च्या वतीने आयोजित 'महाराष्ट्र स्ट्रोक समिट २०२६'चा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना स्ट्रोक सारख्या आजारासाठी शहरी भागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, ग्रामीण भागातही गोल्डन अवरमध्ये अचूक व प्रभावी सुविधा उपलब्ध करणेबाबत उपयुक्त सूचना कराव्यात, असे आवाहन यावेळी केले.
स्ट्रोकसारख्या आजारात ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णाला उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने टेलिमेडिसिनच्या माध्यमातून शहरातील तज्ञ डॉक्टरांचे ग्रामीण भागात मार्गदर्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच १०८ रुग्णवाहिकेत न्यूरो व स्ट्रोक सारख्या आजारावर तात्काळ उपचार करण्याच्या अनुषंगाने आधुनिकीकरणाबाबत सूचनांचे स्वागत आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयात अशा आजाराबाबत काही खाटा आरक्षित ठेवण्याबाबतही विचार विनिमय सुरू असून समिट मधील सूचना व कार्यवाहीच्या अनुषंगाने मंत्रालयातील विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून योग्य ते धोरण ठरवले जाईल, असे प्रतिपादन यावेळी केले.
महाराष्ट्र सरकारने मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्ट्रोक' संबंधित आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला आहे. त्याचबरोबर २३९९ आजारांचा समावेशही केला असून, पॅकेजमध्ये वाढ केली आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासन आणि तज्ज्ञांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी केईएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन डांगे यांनी स्ट्रोकचा तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी थ्रोम्बोलायसिस व थ्रोम्बेक्टॉमीसारख्या उपचारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला आयएमपीएफचे सेक्रेटरी विनोद भानू, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, तसेच विविध वैद्यकीय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments