बोराडी : किसान विद्या प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडी येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयात विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थितांनी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी व स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याला अभिवादन केले. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादरीकरण करून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि इतिहास प्रभावीपणे सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक पोशाखांमधून महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडले. या सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. चेतन माळी यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आयोजन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे तसेच नगरसेवक रोहित रंधे यांनी महाविद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण झाला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला.

Post a Comment
0 Comments