Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर उत्साहात संपन्न...

 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय तळोदा व तहसील कार्यालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ स्तरावरील सोमावल येथे दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” आयोजित करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन मा. आमदार श्री. राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.


या शिबिरामध्ये सोमावल मंडळ कार्यक्षेत्रातील नागरिकांना विविध महसुली सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, ई-शिधापत्रिका, डिजिटल ७/१२ व ८-अ, तसेच वर्ग २ मधून वर्ग १ करण्यात आलेल्या जमिनींचे अद्ययावत सातबारे वितरित करण्यात आले. तसेच प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. भूसंपादन व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणांमध्ये कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले.

शिबिरात एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात आले. तसेच अकृषिक परवानगी, सनद आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) २०२५ अन्वये शासन निर्णय दिनांक १० फेब्रुवारी २०२६ बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत विधवा महिला, सिकलसेल रुग्ण, दुर्धर आजारग्रस्त, अपंग तसेच इतर गरजू नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये नवीन मतदार नोंदणी, नाव कमी करणे, नाव दुरुस्ती व स्थलांतर याबाबत अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच शासनाच्या महत्त्वाकांक्षी SIR मोहिमेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

सदर शिबिरात भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, वन विभाग आदी विभागांनी सहभागी होऊन नागरिकांना विविध सेवा व योजनांची माहिती दिली. या शिबिरामध्ये एकूण सुमारे 775 लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला.

या कार्यक्रमास मा. आमदार श्री. राजेश दादा पाडवी, श्री. दिपक धिवरे, तहसीलदार तळोदा, श्री. दिनेश वळवी, तालुका आरोग्य अधिकारी तळोदा, श्री. अनिल चांगूने, उप अधीक्षक भूमी अभिलेख, श्री. अशोक सोनकांबळे, दुय्यम निबंधक तळोदा, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच इतर लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments