आज शिरपूर येथील आमदार कार्यालयास विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिरपूरचे आमदार मा. श्री. काशिरामदादा पावरा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. तसेच शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व “विकास योजना आपल्या दारी” अभियानाचे प्रमुख मा. श्री. के. डी. पाटील यांनीही स्वागत केले.
या भेटीदरम्यान आमदार कार्यालयातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना गोरगरीब व तळागाळातील नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवल्या जातात याची सविस्तर माहिती देण्यात आली. माजी नगराध्यक्ष मा. श्री. भुपेशभाई पटेल तसेच नगराध्यक्ष मा. श्री. चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १२० कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यपद्धतीचे आणि जनतेसाठी होत असलेल्या कामाचे मा. राम शिंदे साहेबांनी विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments