Type Here to Get Search Results !

बोराडी फार्मसी महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकासावर प्रेरणादायी कार्यशाळा उत्साहात संपन्न..

बोराडी प्रतिनिधी - 

किसान विद्या प्रसारक संस्था संचलित इंस्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडी येथे “व्यक्तिमत्त्व विकास आणि स्व-मूल्यांकन” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून लाईफ कोच व प्रशिक्षक ऐजाज शेख (जीवन संजीवनी एच.आर.डी. इंस्टिट्यूट, सांगली) उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रभावी व प्रेरणादायी शैलीतून चतुर्थ वर्ष बी. फार्मसी व एम. फार्मसीच्या एकूण १३८ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध पैलू, आत्मविश्वास वाढवण्याच्या पद्धती, स्वतःचे मूल्यांकन करण्याचे महत्त्व, तसेच करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांचा लाभ घेऊन स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. कल्पेश मोरे यांनी समन्वयक म्हणून केले. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, तसेच नगरसेवक रोहित रंधे यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

एकूणच, या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.

Post a Comment

0 Comments