Type Here to Get Search Results !

जिल्हास्तरीय सरस महोत्सवाचा शहादा येथे थाटात शुभारंभ.शहाद्यामध्ये ग्रामीण उत्पादने आणि संस्कृतीचा जागर!...

 नंदुरबार: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद ,नंदुरबार आयोजित जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन 'उमेद' अभियानाच्या वतीने आयोजित 'जिल्हास्तरीय सरस व विक्री प्रदर्शन - महोत्सवाचा उद्घाटन सोहळा दिनांक १६ मार्च रोजी उत्साहात पार पडला. सरस प्रदर्शनात शहादा तालुक्यातील एकूण १३ प्रभागातील व अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नंदुरबार व नवापुर तालुक्यातील उमेदचे ६० पेक्षा अधिक महिला स्वयं सहायता समूहाचे स्टोल सहभागी झाले आहेत. 


प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

     कार्यक्रमाचे उद्घाटन शहादा नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री.अभिजित दादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक मा.श्री.चंद्रकांत पवार, शहादा प.स चे गटविकास अधिकारी मा.श्री .महेश पोतदार, सहायक गट विकास अधिकारी मा.श्री.विकास राठोड, इंजिनिअर हरिश्चंद्र भोई जिल्हा अभियान व्यवस्थापक मा.श्री.यशवंत ठाकूर, कार्यालयीन अधीक्षक मा.श्री.चंद्रकांत चावरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी मा.महेश पोतदार यांनी केले. मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत पवार यांनी ग्रामीण भागातील उपस्थित महिला स्वयं सहायता समूहातील महिलांना संबोधित करताना उमेद अभियानाचा माध्यमातून सुरु असलेली महिला स्वयंसहायता गटाची चळवळ अधिक व्यापक झाली असून महिला बचत गटाचा माध्यमातून स्वावलंबी बनत असून, लखपती दीदी देखील होत आहे. तसेच बँक कर्ज, समुदाय गुंतवणूक निधी या माध्यमातून देखील कर्ज घेऊन विविध व्यवसाय करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी गटातील महिला प्रेरिका सौ.कविता अशोक भामरे, गणोर यांनी देखील अभियानाच्या  माध्यमातून महिलांचे व कुटुंबाचे जीवनमान कसे उंचावत आहे. या बाबत प्रातेनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात मा.श्री.अभिजित दादा पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांची नेतृत्व क्षमता व विक्री कौशल्य इत्यादी संदर्भात कौतुक करून महिला स्वयं सहायता समूहाना भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मुख्यबाजार पेठ मिळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहकार्य केले तर त्यांना अधिक चालना मिळण्यास मदत होईल व ते अधिक प्रबळ होतील असे मत व्यक्त केले. शहादा शहर वासियांनी तीन दिवसीय सरस महोत्सवाला भेट देऊन खरेदी करण्याचे आवाहन केले. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक श्री.राजेश देवकर यांनी तर उपस्थित मान्यवरांचे अभार तालुका अभियान व्यवस्थापक मा.श्री.ईश्वर जगदाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments