बोराडी : किसान विद्या प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडी येथील द्वितीय वर्ष एम. फार्मसी (फार्मास्युटिकल क्वालिटी अशुरन्स) विभागातील पाटील वैष्णवी आर. व ठाकरे नंदिनी एच. या दोन विद्यार्थिनींची हैदराबाद येथील बहुराष्ट्रीय नामांकित औषधनिर्मिती कंपनी हेटेरो लॅब्स लिमिटेड येथे पदव्युत्तर प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे.
या यशामुळे महाविद्यालयासह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत प्रोजेक्टची संधी मिळणे हे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तेचे व संस्थेच्या दर्जेदार शिक्षणपद्धतीचे द्योतक मानले जात आहे.
सदर विद्यार्थिनींना फार्मास्युटिकल क्वालिटी अशुरन्स विभागाचे प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील, फार्मास्युटिक्स विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ तसेच प्रा. पंकज एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहित रंधे, प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळाले असून, भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment
0 Comments