Type Here to Get Search Results !

शहाद्यात राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिर १७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य उपक्रम

 शहादा प्रतिनिधी 

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिमको) कानपूर यांच्या सहकार्याने शहादा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट  आमदार राजेशदादा पाडवी यांच्या प्रयत्नांना विशेष सहकार्य लाभले आहे.


या शिबिरामध्ये ६० वर्षांवरील गरजू ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारची सहाय्यभूत साधने वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये वॉकर, श्रवणयंत्र, काठी, व्हीलचेअर, चष्मे, कंबरपट्टा, गुडघा पट्टा, मानपट्टा तसेच इतर आवश्यक कृत्रिम अवयवांचा समावेश आहे.

आवश्यक कागदपत्रे :

वय ६० वर्षांवरील असल्याचा पुरावा

आधार कार्ड झेरॉक्स

रेशन कार्ड झेरॉक्स

२ पासपोर्ट साईज फोटो

शिबिराची माहिती :

📍 स्थळ: शहादा नगर परिषद, शाळा क्रमांक ९ व १६, श्रीराम कॉलनी, शहादा (नविन पीपल बँक समोर)

📅 दिनांक: मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६

⏰ वेळ: सकाळी १० वाजता

शहादा तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमासाठी उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील,  नगरसेवक श्री हरिशंद्र उद्धव पाटील, नगरसेविका सौ. ममताताई  हेमराज पवार व नगरसेविका सौ. सविताबाई पांड्या पाटील यांनी पुढाकार घेतला असून गरजू नागरिकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments