'आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले' या उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावात युवकांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली. या ग्रामसभेत गावातील युवक, नागरिक व अभ्यासिकेचे वापरकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या बैठकीत —
▪️ गावातील अभ्यासिकेचे नियमित निरीक्षण (Monitoring) कसे करावे
▪️ अभ्यासिकेचा योग्य व प्रभावी वापर कसा वाढवावा
▪️ युवक, युवती तसेच सर्व ग्रामस्थांचा सहभाग कसा वाढवता येईल
▪️ अभ्यासिकेच्या दैनंदिन कार्यपद्धतीत युवकांची, गावकऱ्यांची भूमिका
या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.युवकांच्या पुढाकारामुळे अभ्यासिका ही ग्रामस्तरावर समुदायाच्या सहभागातून चालणारी जबाबदार शैक्षणिक व्यवस्था म्हणून आकार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Post a Comment
0 Comments