Type Here to Get Search Results !

तळोद्यात आमदार राजेशदादा पाडवी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे उत्साहात सामूहिक श्रवण..

तळोदा येथे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शवली.


या प्रसंगी केंद्रीय आमदार राजेशदादा पाडवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, डांबरे सर, जितेंद्रभाऊ सूर्यवंशी, नारायणदादा ठाकरे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे पंतप्रधानांच्या विचारांचे श्रवण करत देशहिताच्या विषयांवर चिंतन केले.

‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी विविध सामाजिक, विकासात्मक आणि राष्ट्रीय विषयांवर मार्गदर्शन केले. आत्मनिर्भर भारत, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि युवकांच्या सहभागाबाबत त्यांनी सकारात्मक संदेश दिला. त्यांच्या विचारांमुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, समाजहितासाठी पुढाकार घ्यावा आणि राष्ट्रनिर्मितीत आपला वाटा उचलावा, असा संदेश या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाला. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात करण्यात आले.

Post a Comment

0 Comments