Type Here to Get Search Results !

खतगाव ता. नवापूर येथे भारतीय जनता पार्टी नवापूर ग्रामीण मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..

खतगाव ता. नवापूर येथे भारतीय जनता पार्टी नवापूर ग्रामीण मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेशभाऊ माळी यांच्या हस्ते जळखे टिम व खतगाव टिम या दोघांमधे फायनल मॅच ची नाणे फेकुन सुरुवात करण्यात आली. दोघांमध्ये रोमांचक सामना रंगला. विजेता जळखे टिम ला रोख रू २५०००/- (पंचवीस हजार) व करंडक देताना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेशभाऊ माळी व नवापूर विधानसभा प्रमुख श्री अजयजी वसावे सोबत भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री मनोज गायकवाड सर, कायदा आघाडी चे जिल्हाध्यक्ष ॲड श्री महेशभाऊ माळी, खांडबारा मंडल अध्यक्ष श्री दिलीप वळवी, नवापूर ग्रामीण अध्यक्ष श्री सत्यपाल वसावे, श्री सुदामभाई पटेल, श्री महेंद्रभाऊ पाटील, श्री सागर पाटील सर व मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील तरूण खेळाडू उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments