Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आले..

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आले. याप्रसंगी मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे उपस्थित होत्या.


महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणे याला शासनाचे प्राधान्य आहे. या भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे. दुर्धर आजारांवर महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना मर्यादा येतात मात्र राज्यात यापुढे उपचाराविना कुणीही मृत्यू पावणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांनी राज्याच्या एकात्मिक विकासाला पाठबळ देण्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून धोरणात्मक भागीदारी अधिकृत केली असल्याचे टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी सांगितले. नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनी शासनासोबत जलसंधारण क्षेत्रात काम करण्यास मदत मिळत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments