Type Here to Get Search Results !

सडक सुरक्षा – जीवन सुरक्षा अभियान अंतर्गत २०२६

 महामार्ग पोलीस केंद्र शिरपूर येथे प्रशस्तीपत्रक व हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचविण्यासाठी सातत्याने मोलाची कामगिरी करणारे ( मृत्युंजय दूत ) यांना त्यांच्या उल्लेखनीय व प्रेरणादायी सेवेसाठी सन्मानित करण्यात आले. त्यांना पोलीस उपअधीक्षक श्रीमती. कुमुद कदम साहेब (नाशिक) व पोलीस अधीक्षक श्रीमती श रूपाली अंकुरे साहेब (परिक्षेत्र ठाणे) यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्रक तसेच हेल्मेट प्रदान करण्यात आले.


या प्रसंगी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले. तसेच “बालविवाह मुक्त भारत” या उपक्रमांतर्गत उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी साहेब, पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे साहेब, पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा गोपनारायण साहेब, sun - star चे मॅनेजर पटेल साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री. भुषण पाटील साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री. लक्ष्मण गवळी साहेब तसेच महामार्ग पोलीस केंद्र शिरपूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments