Type Here to Get Search Results !

आदिवासी अकादमी नंदुरबार येथे कवी संतोष पावरा यांचे व्याख्यान....

काकारदा  प्रतिनिधी - अर्जुन पावरा 

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. संचलित आदिवासी अकादमी नंदुरबार.

येथील एम.एस.डब्ल्यू.- प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे 'राष्ट्रीय सेवा योजना' विशेष हिवाळी शिबिर टोकळतळे ता. जिल्हा नंदुरबार येथे दिनांक : २५/०१/२०२६ ते ३१/०१/२०२६ दरम्यान पार पडत आहे. 


        या वेळी युवा कवी साहित्यिक संतोष पावरा प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपल्या कविता आणि आदिवासी लोकगीते गाऊन मंत्रमुद्ग केले.तसेच संविधानातील मूलभूत अधिकार आणि संविधान मूल्ये पटवून देतांना आदिवासी  मौखिक इतिहास 'गायण' परंपरेतील उदाहरण सोप्या पद्धतीने समजून दिले. व पुढे कवी संतोष पावरा म्हणाले, ध्येय निश्चित करा ते साध्य करण्यासाठी भरपूर मेहनत घ्या. आपण कल्पना करू शकत नाही असे यश मिळेल. पण त्या आधी  व्यतिरिक्त इतर काही दिसले नाही पाहिजे. यावेळी महाविद्याल याचे प्रा. स्मिता देशमुख प्रा. हर्षल चौरे प्रा. डॉ. अर्चना पाटील प्रा. राजेश पावरा प्रा. रविंद्र पवार प्रा. करमसिंग पावरा प्रा. विपुल वसावे. आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेश पावरा यांनी केले तर आभार प्रदर्शन:

प्रियांका राठोड ने केले.

Post a Comment

0 Comments