Type Here to Get Search Results !

शिरपुरचे ग्रामदैवत श्री. खंडेराव महाराज यात्रोत्सव प्रारंभ, महाआरती..


 शिरपुरचे ग्रामदैवत श्री. खंडेराव महाराज यात्रोत्सवास दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सालाबादा प्रमाणे श्री. खंडेराव महाराज यात्रोत्सवाची महाआरती करुन सुरुवात झाली. २७४ वर्षांची परंपरा असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण कार्य केलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराज यात्रेचे या धार्मिक सोहळ्याचे महाआरती आ. श्री. काशीराम पावरा, शि. व. न. पा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुऴे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली. तसेच यात्रेचे उद्घाटन आ. श्री. काशीराम पावरा, धुऴे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केल. आ. श्री. काशीराम पावरा, धुऴे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी खंडेराव महाराज यात्रेविषयी विचार व्यक्त केला. कार्यक्रमास शिवनपा उपानगराध्यक्षा सौ. संगिता देवरे, आरसी पटेल कार्यध्यक्ष राजगोपाल भंडारी, जिप माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, डि. वाय. एस. पी. सुनिल गोसावी, शिरपुर पोनि किशोरकुमार परदेशी, धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडी सरपंच किशोर माऴी, शनी मंदीर माजी अध्यक्ष एन. डी. पाटील, शिवसेना उबठा नेते राजु टेलर, माजी नगर सेवक सुरेश बागुल, शिवसेना उबठा गटाचे भरतसिंह राजपुत, हिम्मतराव महाजन आदि मान्यवर म्हणुन उपस्थित होते. तर श्री. खंडेराव बाबा विकास संस्था अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे व विश्वस्त यांनी स्वागत केले. पत्रकार, भाविक बंधू भगिनी या शुभ व धार्मिक सोहळ्यासाठी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments