Type Here to Get Search Results !

शिरपूर तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्रोत डॉ.हिरा पावरा व वहिनी इंजि.पूनम पावरा

 शिरपूर तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्रोत ज्यांनी कमी वयात सामजिक, आरोग्य व शैक्षणिक अशा अनेक विषयांत समाजाला मुख्य प्रवाहात पुढे आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात असे आमचे दादा डॉ.हिरा पावरा व वहिनी इंजि.पूनम पावरा TTSF [Tribal Talent Search Foundation] च्या इतिहासातील प्रेरणादायी जोडी, शिरपूर तालुक्यात TTSF आणण्यासाठी अग्रण्य असणारे ह्यांना काल पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल TTSF ला २०२०/- रु. Donate म्हणून युवांच्या भविष्यासाठी दिले आहे.


    समाजासाठी आयडॉल असलेल्या ह्या जोडीचे २०१६ साली जेव्हा लग्न झाले होते तेव्हा लग्नातील भेट आहेर रक्कमेतून १०% रक्कम जवळजवळ (१० हजार) आदिवासी समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी धडपडणारे समाजाचे प्रेरणास्थान उपायुक्त मा.अजय खर्डे ह्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी नवसंजीवनी असणारी TTSF ह्या संस्थेला भेट दिली होती.

     लग्नानंतर ह्या जोडीला जेव्हा प्रथम अपत्य पुत्रिरत्न प्राप्त झाले होते तेव्हा आदिवासी मुलांचे भविष्य घडविणाऱ्या TTSF ह्या संस्थेला २१०० रुपये Donate केले होते

    अन् आता पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणून ह्या आनंदाच्या क्षणी ही जोडी कायम TTSF व शिक्षणाच्या ताकदीवर भविष्य घडविण्यासाठी धडपडत असणाऱ्या युवकांसोबत सोबत कायम आहेत.



Post a Comment

0 Comments