Type Here to Get Search Results !

नंदुरबार: मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवांचा आढावा...

 अक्कलकुवा (नंदुरबार): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये पिंपळखुटा, जांगठी, मनीबेली आणि चिमलखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश होता.


'अरुणोदय' मोहिमेवर विशेष भर :- 

या दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांनी 'अरुणोदय सिकलसेल आजार नियंत्रण मोहिमे' अंतर्गत सुरू असलेल्या कामाची सखोल माहिती घेतली. त्यांनी स्वतः उपस्थित राहून आशा स्वयंसेविकांकडून DBS (Dred Blood Spot) किटचे प्रात्यक्षिक करून घेतले, जेणेकरून सिकलसेल निदानाची अचूकता तपासता येईल.

तरंगता दवाखाना: दुर्गम भागातील जीवनवाहिनी :- 

नर्मदा काठावरील ज्या गावांचा संपर्क नाही अशा गावांसाठी चालवल्या जाणाऱ्या 'बोट पॉईंट' वरील (तरंगता रुग्णवाहिका) ची त्यांनी पाहणी करुन 'नवसंजीवनी योजने'अंतर्गत कार्यरत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या या सेवांबद्दल पाहणी करुन समाधान व्यक्त केले आणि दुर्गम भागातील नागरिकांना अधिक सक्षमपणे सेवा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

आरोग्य केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी :- 

मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांनी आरोग्य केद्रामार्फत देण्यात येणा-या विविध आरोग्य सेवाची पहणी करुन आवश्यक सुचना दिल्या.

• प्रसुतीगृह: माता आणि बाल संगोपन सुविधांची पाहणी.

• औषध भांडार: आवश्यक औषधांचा साठा आणि उपलब्धतेची खात्री.

• शस्त्रक्रिया गृह: उपकरणांची निगा आणि स्वच्छतेची तपासणी.

आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि रुग्णांना तात्काळ व दर्जेदार उपचार मिळण्यासाठी मार्गदर्शन केले.

उपस्थित अधिकारीया दौऱ्यावेळी डॉ. अनिल पाटील, प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा साथरोग वैद्यकीय अधिकारी, गट विकास अधिकारी व सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा,  तसेच  गट स्तरावरील पर्यवेक्षकिय क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments