Type Here to Get Search Results !

कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव..

 नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या चित्ररथाने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, याचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मिळालेला हा बहुमान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री यांना प्रदान करण्यात आला.


या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची अष्टविनायक परंपरा आणि गणेशोत्सवातील सार्वजनिक सहभागाचे दर्शन घडवण्यात आले होते. तसेच या उत्सवामुळे मूर्तीकाम, सजावट आणि वाद्य निर्मिती क्षेत्रात लाखो हातांना मिळणाऱ्या रोजगाराचे प्रभावी सादरीकरण यात करण्यात आले होते. मुख्यमंत्री यांनी चित्ररथाच्या या यशाचे आणि चमूचे भरभरून कौतुक केले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments