Type Here to Get Search Results !

इयत्ता १२ वी मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची पाहणी..

 इयत्ता १२ वीच्या मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी एकलव्य विद्यालय तसेच जी.टी.पी. शाळा येथे भेट देऊन परीक्षा प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी त्यांनी परीक्षा केंद्रावरील सर्व व्यवस्था, प्रश्नपत्रिकांच्या वितरणाची गोपनीय पद्धत, विद्यार्थ्यांची उपस्थिती, आसनव्यवस्था तसेच आवश्यक मूलभूत सोयी-सुविधांची सविस्तर पाहणी केली.


मा. अंजली शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत परीक्षा प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश दिले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आवश्यक दक्षता घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला. परीक्षा प्रक्रियेतील शिस्त, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षा देता यावी, हा प्रशासनाचा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



Post a Comment

0 Comments