नंदुरबार जिल्ह्यात निती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रम (Aspirational District Programme) अंतर्गत ‘संपूर्णता अभियान 2.0’ ला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी (HODs) उपस्थित होते.
‘संपूर्णता अभियान 2.0’ अंतर्गत पुढील तीन महिन्यांत नीती आयोगाने निर्धारित केलेल्या 5 प्रमुख निर्देशांकांमध्ये (Indicators) लक्ष्यित शंभर टक्के प्रगती (Targeted Saturation) साध्य करण्यावर भर देण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत प्रमुख निर्देशांक:
1️⃣ जन्मावेळी वजन केलेल्या जिवंत बालकांचे प्रमाण
2️⃣ अंदाजित रुग्णसंख्येच्या तुलनेत क्षयरोग (TB) प्रकरण नोंदणी दर
3️⃣ मागील एका महिन्यात किमान एक ग्राम आरोग्य व स्वच्छता दिन (VHSND) आयोजित केलेल्या अंगणवाड्यांचे प्रमाण
4️⃣ कार्यरत मुलींच्या शौचालयासह शाळांचे प्रमाण
5️⃣ लसीकरण झालेल्या जनावरांचे प्रमाण
या बैठकीत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेतला. सध्याची स्थिती, प्रलंबित बाबी आणि सुधारणेच्या संधींचे विश्लेषण करून संबंधित विभागांना ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
‘संपूर्णता अभियान 2.0’ अंतर्गत लक्ष्यित प्रगती साध्य करण्यासाठी जिल्हास्तरावर सातत्याने आढावा व मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे नीती आयोगाने निर्धारित केलेल्या निर्देशांकांमध्ये उल्लेखनीय सुधारणा साध्य होऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक गतीमान होणार आहे.

Post a Comment
0 Comments