Type Here to Get Search Results !

संतांचे मौलिक विचार भागवतातून चैतन्य निर्माण करतात- वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज

 नंदुरबार (प्रतिनिधी) - संपादक सुशिल गव्हाणे 

परम पूज्य संत दगडूजी महाराज यांच्या रामनामाची परंपरा पिढ्यानपिढ्या कायम आहे. संतांचे मौलिक विचार जगातले चैतन्य निर्माण करण्याचे व्यासपीठ आहे. यासाठी भागवत कथा श्रवण करणे जीवनात फलदायी ठरते असे प्रतिपादन वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले. 

शहरातील जीटीपी कॉलेज रोडवरील  लोकमान्य कॉलनी येथे रघुवंशी परिवारातर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताह प्रारंभ झाला आहे.स्व. विजयसिंह रघुवंशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत कथेचे निरूपण अविनाश जोशी महाराज करीत आहेत. याप्रसंगी पुढे बोलताना अविनाश जोशी महाराज म्हणाले की, सन्मानाने आचरण शुद्धीतून स्वतःच्या आचरणासाठी श्रीमद् भागवत कथा आणि स्वाध्याय मानवी जीवनात फलदायी ठरते.


संगीतमय श्रीमद् भागवत कथा श्रवणासाठी भाविक दररोज हजेरी लावत आहेत. संगीतमय भागवत कथेत गायक अनिरुद्ध जोशी, तबला मुकेश पडोळे,हार्मोनियमवर आनंदा बेंद्रे, सिंथ  वादक सोहम बनसोड (अमरावती) हे कलावंत  साथ देत आहेत.पौरोहीत्य महेंद्र जोशी, विलास जोशी करीत आहेत.

दुपारी दोन ते पाच या वेळेत श्रीमद् भागवत कथा होत असून मंगळवार दि. 13 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता  श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होईल. तसेच श्रीमद् भागवत कथेची सांगता शुक्रवार 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वा. होईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी श्रीमद् भागवत कथा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक विलास रघुवंशी, अतुल रघुवंशी, आनंद रघुवंशी, जय रघुवंशी आणि नगरसेविका सायली रघुवंशी यांनी केले आहे.


 

Post a Comment

0 Comments