नंदुरबार प्रतिनिधी
निती आयोगाच्या Aspirational Districts Programme अंतर्गत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे व उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या ब्रेन हेल्थ क्लिनिकमार्फत रनाळे येथे आशा सेविकांसाठी मेंदू आरोग्याविषयक मार्गदर्शन व परिचय (IEC & Orientation) सत्र दि. २२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले. हे सत्र रनाळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय पवार यांच्या सहकार्याने पार पडले.
या सत्रात रनाळे परिसरातील १८ आशा सेविका व १ समुपदेशक, असे एकूण १९ सहभागी उपस्थित होते. कार्यक्रमात नंदुरबार ब्रेन हेल्थ क्लिनिकचे जिल्हा समन्वयक श्री. ओजस भावसार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवान अन्सारी , फिजिओथेरपिस्ट डॉ. कल्याणी माळी आणि मानसोपचार समुपदेशक पूजा शर्मा यांनी ब्रेन हेल्थ क्लिनिकची सविस्तर माहिती दिली.यावेळी पक्षाघात (स्ट्रोक), अपस्मार (मिर्गी), मानसिक आरोग्य समस्या तसेच मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित आजारांची प्राथमिक लक्षणे, धोक्याची चिन्हे, लवकर निदानाचे महत्त्व आणि योग्य वेळी रुग्णालयात संदर्भ देण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.ग्रामीण व समुदाय स्तरावर रुग्ण ओळखण्यात आशा सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय पवार यांनी समुदाय पातळीवर लवकर निदान व उपचारासाठी आशा सेविकांचे योगदान निर्णायक ठरते, असे नमूद केले. या सत्रास समुपदेशक निखिल पाटील तसेच रनाळे ग्रामीण रुग्णालयातील परिचारक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
या मार्गदर्शन सत्रामुळे आशा सेविकांना मेंदू आरोग्यविषयक आजार ओळखण्याबाबत अधिक सक्षम माहिती मिळून, भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.


Post a Comment
0 Comments