अजित पवार यांच्या अपघाती मृत्युमुळे उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून कोणावर ही जबाबदारी सोपवली जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. आणि त्यानंतर शुक्रवारी सायंकाळीच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला. त्यानंतर त्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली असून, उद्या म्हणजेच ३१ जानेवारी रोजी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.
.jpeg)
Post a Comment
0 Comments