शहादा प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मोहिदा येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या वीज सब स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या सब स्टेशनमुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत व विश्वासार्ह होणार असून शेतकरी, व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, संबंधित गावाचे सरपंच व उपसरपंच, भाजपा पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे मोहिदा व आजूबाजूच्या गावांच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार राजेशदादा पाडवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, वीजपुरवठा मजबूत झाल्यास शेती, उद्योगधंदे व रोजगाराच्या संधींना गती मिळेल. कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.


Post a Comment
0 Comments