नंदुरबार प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी सोमावल येथील निवासस्थानी आमदार राजेशदादा पाडवी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान शहादा व तळोदा तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, युवकांचे प्रश्न, शिक्षण व रोजगार निर्मिती यासह विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद झाला. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समन्वयाने कार्य करण्यावर दोन्ही आमदारांनी भर दिला.आपुलकीच्या वातावरणात पार पडलेली ही भेट जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

Post a Comment
0 Comments