किसान विदया प्रसारक संस्था संचलित इंस्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी महाविदयालयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनिल जी. घांडगे व डॉ. श्रीराम एस. रगड कर्मवीर व्य. ता. रणधीर आयुर्वेद महाविदयालया बोराडी हे उपस्थित होते त्यांनी बी. फार्मसीच्या विदयार्थ्यांना आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करणे, संतुलित आहार, व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य तसेच व्यसनमुक्त जिवनशैली या विषयांवर मार्गदर्शन केले सदर कार्याक्रमास महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील व उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ यांनी या उपक्रमाबाबत आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती आत्मसात करून ती समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लागते, असेही त्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रमाबद्दल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, धुळे व नंदुरबार जिल्हा ग. स. बँकचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहीत रंधे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments