किसान विदया प्रसारक संस्था संचलित इंस्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी येथील ग्रंथालयात 15 ऑक्टोबर 2026 रोजी भारताचे माजी राष्ट्रपति भारतरत्न डॉ. ए . पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने ग्रंथालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. रत्ना महाले यांनी केले या कार्यक्रमाला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील व उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ यांनी उपस्थीत राहुन डी. फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसीच्या विदयार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगितले कार्यक्रमात विदयार्थ्यांकडुन वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने वाचनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्याक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाबद्दल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, धुळे व नंदुरबार जिल्हा ग. स. बँकचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहीत रंधे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments