किसान विदया प्रसारक संस्था संचलित इंस्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेश, बोराडी महाविदयालयात दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला.
जागतिक फार्मासिस्ट दिनानिम्मीत्त बोराडी गावात रॅली काढण्यात आली तसेच बोराडी गावातील बसस्थानकावर पथनाट्य सादर करुन औषधाचे महत्व सांगून डॉक्टरांना विचारुनच औषध घेणे यावर पथनाट्य सादर करण्यात आले तसेच प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन पोस्टर सादरीकरण करण्यात आले. सदर कार्याक्रमास बक्षीस वितरण करुन सहभागी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले सदर कार्याक्रमासाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार वाघ यांनी विदयार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना वैदकीय क्षेत्रात फार्मासिस्टचे मोलाचा वाटा असुन त्यांनी संशोधनाबद्दल विदयार्थ्यांना प्रेरित केले तसेच हया कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे परीश्रम घेतले
सदर कार्यक्रमाबद्दल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, धुळे व नंदुरबार जिल्हा ग. स. बँकचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहीत रंधे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments