क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव व आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविदयालय, शिरपुर यांच्या संयुक्त विदयमाने घेण्यात आलेल्या धुळे जिल्हास्तरीय संशोधन प्रकल्प सादरीकरण मार्गदर्शन दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये किसान विदया प्रसारक संस्थेचे इंस्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी येथील हेमांगी के. बडगुजर व रेहान बी. गिरासे हया विदयार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषीक पटकविले.
हया विदयार्थ्यानी आरोग्य सेवा विभागातर्गत हे उपकरण तयार केलेले आहे सदर उपकरणचा उपयोग वैदकीय क्षेत्रात चयापचय विकाराच्या मॉनिटरिंग व डायग्नोसिस साठी उपयोग होणार असुन त्यांनी हया उपकरणाची डिझाईन पेटंट नोंदणी भारतात केलेली आहे या उल्लेखनीय यशाबद्दल महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील यांनी हेमांगी बडगुजर व रेहान गिरासे यांचे अभिनंदन केले. विदयार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात पुढाकार घेऊन नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे समाजोपयोगी कार्य करावे, तसेच महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ यांनी कौतुक केले सदर विदयार्थ्याना कार्यशाळेसाठी महाविदयालयातील विदयार्थी विकास अधिकारी प्रा. कल्पेश एस. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
विदयार्थ्यांच्या यशाबदल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, धुळे व नंदुरबार जिल्हा ग. स. बँकचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहीत रंधे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments