आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे येथील 'इनक्युबेशन केंद्राचे' उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले.
विद्यार्थ्यांच्या मनातील सर्जनशील कल्पनांना प्रत्यक्ष उद्योग आणि व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या माध्यमातून आमच्या तरुण तंत्रज्ञांना स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, तज्ज्ञांचे सहकार्य आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, DBATU चे कुलगुरू रजनीश कामत, कुलसचिव प्रा. अमित शेष आणि विद्यापीठातील माझे तरुण विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल विद्यापीठ प्रशासन आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments