Type Here to Get Search Results !

सर्वसाधारण बदल्या - 2026 अंतर्गत 'प्रशासकीय व विनंती' आपसी बदली प्रक्रिया समुपदेशनाव्दारे पारदर्शकपणे संपन्न..

नंदुरबार वार्ताहर : जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सन २०२६ मधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यांत आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नमन गोयल (भाप्रसे) आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मा. श्री. गणेश मोरे यांच्यासह संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवर्गनिहाय समुपदेशन (Counseling) शिबीर उत्साहात पार पडले.


📋 जनगणनेचे नियम पाळत बदल्यांचे नियोजन

शासन स्तरावरून आलेल्या विशेष निर्देशानुसार, ज्या संवर्गातील कर्मचाऱ्यांची 'जनगणना २०२६' च्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, अशा संवर्गांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. हा नियम पाळून इतर महत्त्वाच्या विभागांमधील प्रशासकीय व विनंती बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

🏥 'या' संवर्गांसाठी पार पडले समुपदेशन शिबीर

दिनांक १९ व २० मे २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्हा परिषद नंदुरबार येथील सभागृहात विशेष समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खालील विभागांतील संवर्गांचा समावेश होता:

• आरोग्य विभाग: आरोग्य सेवक (पुरुष व स्त्री), आरोग्य सहाय्यक, एलएचव्ही (LHV), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक.

• पशुसंवर्धन विभाग: पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक.

🔍 १० टक्के मर्यादेत पारदर्शक कार्यवाही

सदर बदली प्रक्रिया ही शासनाच्या नियमांनुसार कार्यरत पदांच्या १० टक्के मर्यादेत राबवण्यात आली.  अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम भागातील रिक्तपदे भरण्यासह इतर चार तालुक्यात समतोल साधुन संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखत, कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांच्या बदल्यांची प्रशासकीय व विनंतीनुसारची कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. 



Post a Comment

0 Comments