Type Here to Get Search Results !

चैत्र पौर्णिमेनिमित्त गुजर नाभिक समाजाची भव्य सभा; ५२ ज्येष्ठांचा गौरव, मान्यवरांचा सन्मान..

शहादा प्रतिनिधी - मनिष सोनवणे 

दि. १ एप्रिल २०२६ (वार बुधवार) रोजी संत सेना नाभिक समाज भवन, रामदेव बाबा नगर, शहादा येथे समस्त गुजर नाभिक समाज, शहादा विभाग यांची सर्वसाधारण सभा चैत्र पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा विभागाचे अध्यक्ष श्री भूषण राजाराम पवार (रा. तळोदा) होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे प्रथम नेतृत्व करणाऱ्या शहादा नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. ममता हेमराज पवार उपस्थित होत्या. तसेच आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक श्री हेमराज भाऊ पवार, सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी श्री अशोक भबुता सोनवणे, अखिल भारतीय गुजर नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री उद्धव मक्कण जांभळे (रा. शहादा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सुभाष सोनवणे, कार्यकारिणी सदस्य, जयप्रकाश बहुदेशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश जाधव, संत सेना पतसंस्था शहादा चे अध्यक्ष श्री संजय जांभळे व कार्यकारिणी सदस्य, समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक सोनवणे व कार्यकारिणी सदस्य, तसेच नवरात्र उत्सव मंडळ, संत सेना गणेश मंडळ व फौंडेशन, गोकर्ण महादेव मंदिर, वीरभाई कोतवाल फौंडेशन तळोदा, साई सेना गणेश मंडळ आदी विविध मंडळांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात लिंबज माता व संत सेना महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व आरतीने करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. युवकांना प्रोत्साहन देणे, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे यावर विशेष भर देण्यात आला.

या वेळी शहादा विभागाच्या वतीने समाजातील पहिल्या नगरसेविका सौ. ममता हेमराज पवार यांना “समाज-रत्न”, सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी श्री अशोक भबुता सोनवणे यांना “समाज-भूषण” तसेच श्री भूषण राजाराम पवार (रा. तळोदा) यांना “युवा-प्रेरणा” पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनेही समाजातील पहिल्या नगरसेविका सौ. ममता हेमराज पवार व श्री भूषण राजाराम पवार यांचा सन्मान करण्यात आला.

सभेत एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी ७५ वर्ष पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या व्यक्तींना त्यांच्या कष्टाळू वृत्ती, समाजाभिमुख कार्य व आदर्श जीवनमूल्यांबद्दल गौरविण्यात आले. समाजाच्या वतीने समाज-गौरव प्रमाणपत्र, भगवद्गीता व भगवान श्रीरामाचा स्कार्फ देऊन एकूण ५२ ज्येष्ठ समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम जेष्ठ समाजसेवक श्री हिरालाल अन्ना बोर्देकर (रा. शहादा) यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर समाजाचे अध्यक्ष श्री उद्धव मक्कण जांभळे यांचाही सन्मान करण्यात आला.

तसेच CTET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या श्री जगदीश सोलंकी यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रा. श्री अनिल साळूखे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय परिध्दी प्रमुख प्रा. श्री गणेश कन्हैया (रा. म्हसावद) यांनी केले.

कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ मंडळी, विविध मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांसाठी रुचकर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील सर्व सदस्यांनी तसेच शहादा विभागीय पंच व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments