जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर मालेगावच्या सुपुत्राने पुन्हा एकदा यशाचे शिखर गाठले आहे. मालेगाव तालुक्यातील सोयगावचे रहिवासी कार्तिक रविंद्र बच्छाव यांनी आपल्या कर्तृत्वाची नवी उंची गाठत २०२६ च्या UPSC निकालात अखिल भारतीय स्तरावर ११७ वा क्रमांक (AIR 117) मिळवून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) पद प्राप्त केले आहे.
गेल्या वर्षी IPS अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतरही न थांबता त्यांनी सातत्याने परिश्रम करत यंदा IAS पद मिळवत एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाने केवळ मालेगावच नव्हे तर संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला असून, अनेक तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.
शून्यातून उंच भरारी घेण्याची जिद्द, कठोर परिश्रम आणि ध्येयावर असलेला दृढ विश्वास यांच्या जोरावर कार्तिक बच्छाव यांनी हे यश संपादन करत नवा आदर्श निर्माण केला आहे.
कार्तिक बच्छाव यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!
त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यास हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments