Type Here to Get Search Results !

धुळे तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो....

 धुळे तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो.त्या अनुषंगाने दि. ४ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री मा.ना.गिरीशजी महाजन साहेब यांनी विशेष बैठक बोलावली.


या बैठकीत धुळे ग्रामीणमधील सोनगीर, दापुरा, सरवड, कापडणे, देवभाने, धमाणे, नगाव, बिलाडी, वडेल, निकुंभे, मेहरगाव, निमडाळे, सडगाव आदी गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासह शेतीला थेट पाणी देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांनी योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांना महिन्याभरात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या माध्यमातून सुलवाडे–जामफळ–कनोली उपसा योजनेचा लाभ धुळे ग्रामीणमधील शेतकरी व नागरिकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतीला बळ मिळेल तसेच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.

ही योजना धुळे ग्रामीणच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.



Post a Comment

0 Comments