Type Here to Get Search Results !

चिखली मतदारसंघात रस्ते विकासकामांना गती, निर्माणाधीन प्रमुख रस्त्याची केली पाहणी:

 चिखली मतदारसंघातील शेतकरी बांधवांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी  धोडप-पेठ-एकलारा-अंबाशी चंदनपुर रस्ता रामा 439 सा. क्र. 0/00 ते 29/00 ची सुधारणा करणे. 


ह्या रस्त्याच्या कामाची सविस्तर पाहणी केली. या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार असून हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या विकास पाहणी दौऱ्यात संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत मौजे चंदनपूर, मौजे काटोडा, मौजे अंबाशी, मौजे एकलारा, मौजे बोरगाव काकडे येथे पाहणी पूर्ण केली. 

✴️ मतदारसंघाच्या विकासाचा महामार्ग:

पाहणी दौऱ्यात उपस्थित कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच व गावकरी यांना संबोधित करताना सांगितले की, "चिखली मतदारसंघातील शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी, त्यांना बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सोपे व्हावे यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. हे काम केवळ रस्ता नाही, तर अनेक पूल या रस्त्यामध्ये असून हा रस्ता चिखली मतदारसंघाच्या विकासाचा महामार्ग आहे. काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहू. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आपल्या चिखली मतदारसंघाला विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा पुरेपूर उपयोग सामान्य माणसांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी मी करणार आहे. या पाहणीदरम्यान प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या कामाचा आढावा घेऊन कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या.

✴️ अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीच्या सूचना:

या पाहणी दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे काही महत्त्वाच्या बाबी मांडल्या. तसेच रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी केली. या सर्व मागण्यांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

✴️ दर्जाबाबत तडजोड नाही:

पाहणी दौऱ्यात संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. रस्त्याच्या कामाचा सध्याचा टप्पा, कामाची गुणवत्ता, निधीची उपलब्धता आणि काम पूर्णत्वाची अपेक्षित तारीख यांचा आढावा घेतला. कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही या वेळी दिला.

✴️ पाहणी दौर्‍याचे स्वागत:

या विकास पाहणी दौऱ्याचे प्रत्येक गावात उत्साहाने स्वागत करण्यात आले. चिखली मतदारसंघात इतक्या मोठ्या रकमेचे रस्त्याचे काम सुरू केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेतकरी व गावकऱ्यांनी आमचे उत्साहाने स्वागत केले.

या पाहणी दौऱ्यात सर्वश्री संजय गाडेकर जिल्हा उपाध्यक्ष भाजप, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, नीरज गायकवाड तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, तहसीलदार विजय सवडे साहेब, उपविभागीय कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी समाधान वाघ, गणेश भगुरे साहेब, बंडू अंभोरे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, लक्ष्मणराव अंभोरे, शैलेश अंभोरे, तेजराव अंभोरे, मनोज कुटे, कृष्णा चौथे, सौ. सिंधू तायडे माजी सभापती, नवलसिंग इंगळे, गोपीनाथ लहाने युवा सेना तालुका प्रमुख, पंजाब देशमुख, श्रीनिवास, विजय आडचुळे एमएसआरडीसी, शिवानंद गायकवाड यांच्यासह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, बूथ प्रमुख आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Post a Comment

0 Comments