Type Here to Get Search Results !

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हक्काचे वसतिगृह बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक निर्णय झाला आहे....

 ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हक्काचे वसतिगृह बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक निर्णय झाला आहे. मागील मोठ्या कालावधी पासून बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने बीड जिल्ह्यातील स्थलांतरित ऊसतोड कामगारांची मोठी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि हक्काचे शासकीय वसतिगृह उभारण्यात यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो.


संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना प्रभावीपणे राबवून ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, ही माझी ठाम भूमिका होती. या विषयावर स्व.अजितदादा पवार यांनी तातडीने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली होती. तसेच सामाजिक न्याय मंत्री मा.ना. संजय शिरसाट साहेबांनीही या कार्याला मंजुरी देत मोठा निर्णय घेतला.

संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात 11 वसतिगृहे उभारणीस 159.36 कोटी एवढा निधी राज्य शासनाने आज मंजूर केल्याचा शासन निर्णय आला आहे.

हा निर्णय केवळ वसतिगृह उभारणीपुरता मर्यादित नसून तो ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला ऐतिहासिक टप्पा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे हे माझे कर्तव्य आहे; परंतु स्व.अजितदादा पवार यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच अशा कामांना गती आणि यश मिळते.

गरीब, कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि सुरक्षित निवासाची सुविधा मिळणार, हीच माझ्यासाठी खरी समाधानाची बाब आहे.

बीडच्या  विकासासाठी आपला संकल्प कायम आहे!

Post a Comment

0 Comments