माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थान, मुंबई येथे जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस ज्येष्ठ नेते खा.श्री. सुनील तटकरे साहेब उपस्थित होते.
वन्य प्राण्यांमुळे फळपीक आणि शेतमालाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी, राज्य सूचीतील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी व ज्या गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत त्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणेसाठी लघुपाट बंधारे व जलसंधारण अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा अशी भूमिका या बैठकीत मांडली.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे, यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments