Type Here to Get Search Results !

हिंदू रणरागिणी सौ. माधवीताई मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; निमाच–बांसवाडा–दाहोद–अलीराजपूर–नंदुरबार नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी..

 शहादा प्रतिनिधी - 

रेल्वे मंडळ यांच्याकडून निमाच–बांसवाडा–दाहोद–अलीराजपूर–नंदुरबार या सुमारे ३८० कि.मी. लांबीच्या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण (Final Location Survey – FLS) अधिकृतपणे मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहादा शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


रेल्वे विभागाने आकांक्षी जिल्हे व दुर्लक्षित भागांमध्ये संपर्क सुविधा वाढविण्याबाबत आपली कटिबद्धता अधोरेखित केली आहे. मंजूर अंतिम स्थान सर्वेक्षणात या मार्गिकेचा समावेश करण्यात आल्याने शहादा शहराला रेल्वे संपर्क देण्याची मागणी व्यापक धोरणात्मक आराखड्यात समाविष्ट झाली आहे. या प्रकल्पामुळे संबंधित प्रदेशाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या संदर्भात रेल्वे मंत्रालय यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी निविदा सूचना (NIT) जारी केल्याची माहिती दिली आहे. सर्वेक्षणाच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असून, अंतिम मार्ग निश्चित करताना शहादा परिसराच्या गरजांचा योग्य विचार केला जाईल, असे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे.

ही माहिती हिंदू रणरागिणी सौ. माधवीताई मकरंद पाटील यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे. त्यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे शहादा व परिसरातील व्यापार, उद्योग, शिक्षण व रोजगाराच्या संधींना नवी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments