बंजारा समाजाचे आराध्य दैवत व थोर समाजसुधारक संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आज शहादा येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो भाविक, महिला-भगिनी, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसर “जय सेवालाल” च्या जयघोषांनी भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.
कार्यक्रमादरम्यान संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या महान कार्याची आठवण करून देत समाजातील ऐक्य, संस्कृती व परंपरा जपण्याचा संदेश दिला.
यावेळी राजेशदादा पाडवी, तसेच भारतीय जनता पक्ष जिल्हाउपाध्यक्ष मकरंद पाटील सर यांच्यासमवेत समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments