विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या शासकीय सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरिता 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला.
या मोहिमेमध्ये राज्यातील 42 मंत्रालयीन सचिवांच्या अधिनस्त 93 शासकीय आस्थापनांनी केलेल्या कामगिरीचे सामान्य प्रशासन विभागातर्फे गुणांकन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे मूल्यमापन करताना सेवाकर्मी घटकात विभागाचा आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम,पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती स्थिती, अधिकारी/कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल, अनुकंपा तत्त्वावरील भरती, iGot portal द्वारे प्रशिक्षण, विभागीय चौकशी प्रकरणांचा निपटारा अशा विविध 8 मुद्यांचा समावेश केला.
तर सेवाकर्मी टेक घटकात पदोन्नती स्थिती, डिजिटाईज महापार (गोपनीय अहवाल), iGOT कोर्सेस व डिजिटल पोर्टल E-HRMS अशा 4 घटकांचा समावेश होता.
अशा एकूण 12 उद्दिष्टांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मंत्रालयीन सचिवांचे गुणांकन आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे.
150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व मंत्रालयीन सचिव व अधिनस्त आस्थापना प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्या सचिवांचा राज्य शासनातर्फे लवकरच सन्मान करण्यात येईल.

Post a Comment
0 Comments