आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता सन २०२६-२७ चे प्रारुप आराखडे तयार करण्यासाठी नऊ जिल्ह्यांची बैठक झाली. यामध्ये गडचिरोली, धुळे, नागपूर, अमरावती, अहिल्यानगर, नांदेड, गोंदिया, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
आदिवासी भागातील विकासकामांना प्राधान्य देत कामे जलद गतीने व कालमर्यादेत पूर्ण करावीत. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी सर्वसमावेशक आणि परिणामकारक पद्धतीने करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.
या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सुमीत वानखेडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, दूरदृश्य प्रणालीद्वारे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्णि विखे पाटील, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, पणन मंत्री तथा धुळेचे पालकमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, स्थानिक लोकप्रतिनिधी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments