Type Here to Get Search Results !

जी. आर. पाटील माध्यमिक विद्यालयात हुतात्मा दिन उत्साहात साजरा

 ग्राम शिक्षण विकास मंडळ संचलित, जी. आर. पाटील माध्यमिक विद्यालय, गिधाडे येथे ३० जानेवारी रोजी 'हुतात्मा दिन' मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि थोर क्रांतिकारकांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमित बागले सर आणि शिक्षक वृंद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.


सकाळी ठीक ११ वाजता संपूर्ण विद्यालयात दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना श्री अविनाश कुवर आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, हुतात्मा दिन केवळ एक औपचारिक दिवस नसून, आपल्या स्वातंत्र्याचे मोल समजून घेण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानासोबतच राष्ट्रप्रेमाची कास धरणे गरजेचे आहे. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात गांधीजींच्या 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' या सूत्राचा विद्यार्थ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व सांगून स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या बलिदानावर आपले विचार व्यक्त केले. देशप्रेमाच्या कविता आणि भाषणांनी वातावरण भारावून गेले होते.शिक्षकांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अहिंसा, सत्य आणि देशभक्तीची मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले. विद्यालयातील श्री योगेश बागुल सरांनी हुतात्मा दिनानिमित्त शाळेच्या फलकावर सुंदर आणि माहितीपूर्ण फलक लेखन केले होते, जे सर्वांचे आकर्षण ठरले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

0 Comments