शहादा प्रतिनिधी - संपादक सुशिल गव्हाणे
सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत शहादा नगरपरिषद प्रभाग क्रमांक १४-ब मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्याबद्दल सौ. ममताताई हेमराज पवार व जावाई हेमराजभाई प्रकाश पवार यांचा सौ. ममताताई त्यांच्या माहेरी सुरत येथे त्यांचे आई वडील, काका-काकू तसेच समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सौ. ममताताई पवार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले. या प्रसंगी सौ. ममताताई हेमराजभाई पवार यांचे वडील संजयभाई दामु सोलंकी व आई सुनंदाबाई संजय सोलंकी यांनी आपल्या लेकीचा अभिमानाने व मायाळू भावनेतून सत्कार केला. मुलीच्या या यशाचा गौरव करत त्यांनी प्रेमपूर्वक सन्मानाचा कार्यक्रम पार पाडला. लेकीने समाजात व राजकारणात मिळवलेल्या या यशामुळे कुटुंबीयांचा अभिमान द्विगुणित झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सत्कार समारंभाला शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी याचे स्वीय सहाय्यक हेमराजभाई प्रकाश पवार, सुरत महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ. नरेंद्र पाटील, माजी उपमहापौर रवींद्र पाटील, माजी नगरसेवक विनोद पाटील, आलोकभाऊ, समाजाचे उपाध्यक्ष बापूभाई सोनवणे, तुंबाभाई सोलंकी यांच्यासह समस्त सोलंकी परिवार धमाने , समाजातील ज्येष्ठ, तरुण मित्रमंडळी, समाजबांधव तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शहादा शहरातील प्रभाग क्रमांक १४-ब मधून मिळालेल्या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत सौ. ममताताई पवार यांनी पुढील काळात सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या यशामागे कुटुंबीय, समाजबांधव आणि मतदारांचा मोठा पाठिंबा लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment
0 Comments