Type Here to Get Search Results !

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर..

 महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने माहे जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


या निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-01, अक्राणी-16, तळोदा-07, शहादा-27, नंदुरबार-22 व नवापूर-14 अशा एकूण 87 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

प्रभाग रचना कार्यक्रमाचे टप्पे

प्रभाग रचनेचा कार्यक्रम खालील प्रमुख टप्प्यांमध्ये विभागलेला आहे 

प्रारुप प्रभाग रचना तयार करणे

• तहसीलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे वापरून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे: 20 फेब्रूवारी, 2026. 

• तलाठी व ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे: 27 फेब्रूवारी, 2026.

• तहसीलदार अध्यक्षतेखालील समितीने प्रभाग रचनेची तपासणी करणे: 05 मार्च, 2026.

• सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करणे: 11 मार्च, 2026.

• जिल्हाधिकारी यांनी तपासणी करून राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करणे: 17 मार्च, 2026.

• राज्य निवडणूक आयोगाने प्रस्तावास मान्यता देणे: 23 मार्च, 2026.

• दुरुस्त्या अंतर्भूत करून अंतिम प्रभाग रचनेस समितीची मान्यता: 30 मार्च, 2026.

प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे

• प्रारुप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देऊन हरकती/सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करणे: 07 एप्रिल, 2026.

• हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13 एप्रिल, 2026.

• प्राप्त हरकती/सूचना सुनावणीसाठी उप विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे: 16 एप्रिल, 2026.

• उप विभागीय अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी घेणे: 21 एप्रिल, 2026.

• सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे: 23 एप्रिल, 2026.

प्रभाग रचना अंतिम करणे

• जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणे: 28 एप्रिल, 2026.

• राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी देणे: 04 मे, 2026.



Post a Comment

0 Comments