प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामुळे सुलवाडे-जामफळ योजनेस गती मिळाली. 2023-24 या कालावधीत योजनेच्या कामांना वेग आला असून पीडीएन चे सुमारे 200 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. जामफळ धरणाला जोडणारी मुख्य नलीकेचे काम प्रगतीत असून एकूण साडेसातशे किलोमीटर लांबीच्या जाळ्यातून येत्या जून-जुलैपर्यंत 10 हजार हेक्टर क्षेत्र सिंचन क्षेत्राखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल तसेच यापुढची पिढी हा दुष्काळ नावाचा शब्द विसरुन जाईल. शिंदखेडा तालुका 100 टक्के बागायत करण्याचा आमचा निर्धार असून मुख्य पाईपलाईनची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
बेटावद (ता. शिंदखेडा) येथे सुलवाडे-जामफळ योजनेअंतर्गत 54 गावांतील शेतांना थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या पीडीएन योजनेच्या पाईपपूजन सोहळा संपन्न झाला.
February 21, 2026
0
Tags

Post a Comment
0 Comments